Documents Required for Engineering Admission
- MHT-CET आँनलाईन फाँर्म प्रिंट
- MHT-CET* पत्र
- MHT-CET* मार्क लिस्ट
- इयत्ता 10 वी चा मार्क मेमो
- इयत्ता 10 वी सनद
- इयत्ता 12 वी मार्क मेमो
- नँशनँलीटी सर्टीफिकेट
- रहिवाशी प्रमाणपत्र इयत्ता 12 वी टी. सी.
- आधार कार्ड
- उत्पन्न प्रमाणपत्र किंवा फाँर्म नं 16 वडिलांचा
- राष्ट्रीयकृत बँकेतील खाते
- पासपोर्ट साईज फोटो.
मागासवर्गीयांसाठी वरील सर्व व खालील प्रमाणपत्रे सोबत ठेवावीत
- जातीचे प्रमाणपत्र
- जात वैधता प्रमाणपत्र
- नाँन क्रिमीलीयर प्रमाणपत्र
इंजिनियरिंग क्षेत्रा मधील करिअर च्या विविध मार्ग आणि संधी
- सिव्हील इंजीनियरिंग– अभियांत्रिकीच्या सर्वात जुन्या आणि सर्वात महत्वाच्या शाखांपैकी एक आहे. सिव्हील इंजिनियर होणे बहुतांश विद्यार्थ्याचे स्वप्न असते सिव्हिल इंजिनीअर रस्ते, पूल, बोगदे, धरणे, रेल्वेमार्ग, शिपिंग कालवे, सिंचन, नदी जलवाहतूक, आणि इमारती यांसारख्या संरचनांची रचना करतात आणि त्यावर काम करतात या संरचना सुरक्षित आणि कार्यक्षम आहेत याची खात्री करण्यासाठी ते संगणक-सहाय्यित डिझाइन (CAD) साधने आणि गणितीय मॉडेल वापरतात. डिझाईन अंतिम झाल्यावर सिव्हिल इंजिनीअर बांधकाम प्रक्रियेवर देखरेख करतात. स्थापत्य अभियांत्रिकी, पायाभूत सुविधा आणि शहरी विकासामध्ये महत्वाचा वाटा उचलते आपल्या दैनंदिन जीवनाला आधार देणाऱ्या पायाभूत सुविधांचे डिझाईन, बांधकाम आणि देखभाल करण्यात सिव्हिल इंजिनीअर महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. सदर पदवी अभ्यासक्रम 3 ते 4 वर्षांच्या कालावधीसाठी असतो. सिव्हील इंजीनियरिंग केलेल्या व विद्यार्थ्याना शासकीय तसेच खाजगी क्षेत्रात नोकरी मिळू शकते तसेच ते स्वःताचा व्यवसाय करू शकतात.
- इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग- इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीचे क्षेत्र खूप विस्तृत आहे आणि त्यात इलेक्ट्रिक सर्किट्स आणि नाविन्यपूर्ण उपकरणांचा सखोल अभ्यास केला जातो. हे क्षेत्र इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिझमच्या वापराशी संबंधित आहे, जे विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक उपकरणांची रचना, विकास, आणि विजेचा वापर याबाबत व्यावहारिक प्रशिक्षण देण्यावर भर देते. हि शाखा विद्यार्थ्यांना विद्युत निर्मिती विद्युत वहन प्रणाली, आणि विंज वापर यांचे शिक्षण देते. सोलर विद्युत निर्मिती सारखा घटक यामध्ये आल्यामुळे या शाखेचे महत्व अधिकच अधोरेखित झाले आहे. इलेक्ट्रिकल इंजिनियर शाखेस सिव्हील इंजिनियरींग इतकेच महत्व प्राप्त झाले आहे. सदर पदवी अभ्यासक्रम 3 ते 4 वर्षांच्या कालावधीसाठी असतो. इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग केलेल्या विद्यार्थ्याना शासकीय तसेच खाजगी क्षेत्रात नोकरी मिळू शकते तसेच ते स्वःताचा व्यवसाय करू शकतात.यामुळे या शाखेची लोकप्रियता आहे.
- मेकॅनिकल इंजीनियरिंग – यांत्रिक उपकरणांचा शोध जेव्हा प्रथम लागला, त्यावेळी कोणत्याही प्रकारची वीज किंवा इतर कोणत्याही गोष्टीची आवश्यकता नव्हती. म्हणूनच मेकॅनिकल इंजिनीअरिंगची शाखा खूप जुनी ,खूप मोठी आणि आहे आहे असे मानले जाते. मेकॅनिकल अभियांत्रिकीमध्ये, विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या मशीनचे डिझाइन आणि बांधकाम इत्यादींचा अभ्यास या शाखेत केला जातो. वाहन उद्योगामुळे या शाखेस अधिकचे महत्व प्राप्त झालेले असून सदर पदवी अभ्यासक्रम 3 ते 4 वर्षांच्या कालावधीसाठी असतो. मेकॅनिकल इंजीनियरिंग केलेल्या विद्यार्थ्याना शासकीय तसेच खाजगी क्षेत्रात नोकरी मिळू शकते तसेच ते स्वःताचा व्यवसाय करू शकतात.
- कॉम्प्युटर सायन्स इंजीनियरिंग- आज संगणक हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनला यामुळे या इंजीयरिंग शाखेस महत्व आहे. पदवी आणि पदव्युत्तर पदवी अशा दोन्ही स्तरांवर संगणक विज्ञान अभियांत्रिकी पदवी मिळवता येते. सदर शाखा संगणक विज्ञान रोबोटिक्स आणि ऑटोमेशन अभियांत्रिकी, मेकॅट्रॉनिक्स अभियांत्रिकी तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकीच्या संबंधित शाखांशी जवळून संबंधित आहे या वस्तुस्थितीमुळे, ही शाखा अभ्यासाचे विशाल आहे आयटी, डेटा सायन्स, संगणक प्रणाली, सायबर सुरक्षा इत्यादि बाबी या शाखेच्या महत्वाच्या बाबी आहेत. सदर पदवी अभ्यासक्रम 3 ते 4 वर्षांच्या कालावधीसाठी असतो. कॉम्प्युटर सायन्स इंजीनियरिंग केलेल्या विद्यार्थ्याना शासकीय तसेच खाजगी क्षेत्रात नोकरी मिळू शकते किंवा ते स्वःताचा व्यवसाय करू शकतात.
- इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजीनियरिंग- इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी ही विज्ञानाची एक विशेष शाखा आहे ज्यामध्ये वीज, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिझमच्या अनुप्रयोगांचा अभ्यास केला जातो. शिवाय, या क्षेत्राचा अभ्यास करताना, तुम्हाला सिग्नल प्रोसेसिंग, रेडिओ फ्रिक्वेन्सी डिझाइन, पॉवर जनरेशन, इलेक्ट्रिकल मशीन्स, कंट्रोल सिस्टम्स, रेडिओ फ्रिक्वेन्सी डिझाइन यासारख्या विविध विषयांची माहिती दिली जाते या शाखेतील इंजीनियर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माहिती हस्तांतरित करणाऱ्या प्रणालींचा अभ्यास करतात तसेच दूरसंचार, इंटरनेट तंत्रज्ञान, संगणक प्रणाली, नेटवर्किंग, ब्रॉडबँड तंत्रज्ञान आणि रेडिओ संप्रेषणांसह विविध क्षेत्रात देखील यांचे काम महत्वाचे असते दूरसंचार अभियंता हा एक कम्युनिकेशन अभियंता आहे ज्याने दूरसंचार प्रणालींमध्ये विशिष्ट प्रशिक्षण घेतले आहे. ते व्हिडीओ, डेटा आणि व्हॉइस ट्रान्समिशनला सपोर्ट करणाऱ्या सिस्टमवर काम करतात. सदर पदवी अभ्यासक्रम 3 ते 4 वर्षांच्या कालावधीसाठी असतो. इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजीनियरिंग केलेल्या विद्यार्थ्याना शासकीय तसेच खाजगी क्षेत्रात नोकरी मिळू शकते ते स्वःताचा व्यवसाय करू शकतात.
- महत्वाचे – वरील पाच हि शाखेमध्ये इयत्ता 10 नंतर डिप्लोमा कोर्स हा तीन वर्ष कालावधीचा आहे. ( पॉलिटेक्निक डिप्लोमा ) झालेल्या विद्यार्थ्यांना पदवीच्या दुसऱ्या वर्षाला डायरेक्ट प्रवेश मिळतो त्यांच्या साठी पुढील तीन वर्षात पदवी होऊन जाते. मात्र बारावी नंतर MHT-CET उतीर्ण झालेल्या विद्यार्थांना पदवी अभ्यास क्रम चार वर्ष कालावधीचा आहे. आणि पोस्ट ग्रेजुएट कोर्स हा 2 वर्षांचा कालावधीचा अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम करण्यासाठी विद्यार्थ्यांनी संबंधित क्षेत्रातील पदवीधर असणे आवश्यक आहे. आणि ग्रेजुएट एप्टीट्यूड टेस्ट इन इंजीनियरिंग GATE हि परीक्षा पास होणे आवश्यक असते.
- ———————— इंजीनियरिंगच्या आणखी काही महत्वाच्या शाखा———————————-
- अभियांत्रिकीच्या वरील चार प्रकारा व्यतिरिक्त खालील इंजिनियरिंगच्या खालील शाखा देखील अत्यंत महत्वाच्या आहेत. या क्षेत्रात देखील करीयर च्या विविध संधी उपलब्ध आहेत.
- एरोनॉटिकल इंजीनियरिंग– एरोनॉटिकल इंजीनियरिंग महत्त्वाचे आहे या शाखेत रॉकेट, क्षेपणास्त्रे, विमाने यांच्याशी सबंधित घटकांचा / मशीन्सचा अभ्यास केला जातो आणि त्यांची निर्मिती आणि दुरुस्ती करण्याचे शिक्षण या शाखेत दिले जाते या प्रकारचे काम वैमानिक इंजीनिअर करतात. जर तुम्हाला अंतराळाशी संबंधित विविध प्रकारची मशिन डिझाइन आणि बनवण्यात रस असेल तर तुम्ही हा अभियांत्रिकी अभ्यासक्रम करू शकता ज्या विद्यार्थ्यांनी 12 वी विज्ञानची परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (PCM) सह समतुल्य उत्तीर्ण केले आहे आणि परीक्षेत किमान 70 ते 75% गुण मिळवले आहेत ते बीटेक अभ्यासक्रमासाठी एरोनॉटिकल इंजिनिअरिंगच्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. एरोनॉटिकल अभियंत्यास अनुभवानुसार सरासरी वर्षाला सुमारे ५ लाख ते ७ लाख पगार मिळू शकतो.
- पर्यावरण इंजीनियरिंग- अभियांत्रिकी क्षेत्रातील ही एक लोकप्रिय शाखा आहे, जी पूर्णपणे पर्यावरणाशी संबंधित आहे. पर्यावरण अभियंते प्रदूषण आणि इतर पर्यावरणीय समस्यांचे निराकरण करण्यासाठी उर्जेचे नवीन स्त्रोत शोधण्याचे कार्य करतात. या क्षेत्रातील अभियंते ग्रामीण आणि शहरी भागात पाणी व्यवस्थापन सुधारण्यासाठी व प्रदूषणामुळे होणारे रोग टाळण्यासाठी साधने तयार करतात. तंत्रज्ञानातील प्रगतीचा पर्यावरणावरील परिणामांचा अभ्यास जसे ग्लोबल वार्मिंग, प्रदूषण, पावसाचा अभाव, आम्ल पाऊस या बाबीचा अभ्यास या शाखेत केला जातो. पर्यावरण अभियांत्रिकी करण्यासाठी, आपल्याला विज्ञान शाखेत (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) 50 टक्के गुणांसह 12वी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही पर्यावरण अभियांत्रिकी कॉलेज मध्ये अर्ज करू शकता बहुतेक महाविद्यालये प्रवेश परीक्षा घेतात. प्रवेश परीक्षेच्या गुणवत्तेवरच प्रवेश दिला जातो. हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला चार वर्षे लागतील.
- केमिकल इंजीनियरिंग- आज आपल्या जीवनात होता असलेला केमिकल चा वापर बघता इंजिनियरिंगच्या या प्रकारामध्ये रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. सर्वात जास्त मागणी असलेली शाखा म्हणजे केमिकल इंजिनीअरींग आहे. आज सायनिक अभियांत्रिकीमध्ये रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणिताच्या मदतीने कच्च्या मालाचे रूपांतर रसायनांचा वापर करून कपडे, खाद्यपदार्थ यासारख्या उपयुक्त उत्पादनांमध्ये केले जाते. केमिकल अभियांत्रिकीचे काम रासायनिक वनस्पतींमध्ये येणाऱ्या उत्पादनांची रचना आणि प्रक्रिया करणे हे आहे. केमिकल अभियांत्रिकी क्षेत्रात सरकारी नोकरी मिळविण्यासाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून रासायनिक अभियांत्रिकी क्षेत्रातील पदवी (BE/B.Tech) उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. केमिकल अभियंत्यास अनुभवानुसार सरासरी वर्षाला सुमारे 3 लाख ते 8 लाखापर्यंत पगार मिळू शकतो.
- औद्योगिक इंजीनियरिंग-औद्योगिक अभियांत्रिकी प्रामुख्याने वेळ, ऊर्जा, साहित्य, पैसा आणि इतर संसाधनांचा अपव्यय दूर करण्यासाठी लोकांच्या एकात्मिक प्रणाली आणि प्रक्रियांच्या विकास, अंमलबजावणी आणि मूल्यांकनामध्ये गुंतलेली आहे. या शाखेत विविध शैक्षणिक विषयांचा समावेश आहे जसे की, थर्मल अभियांत्रिकी,व्यवस्थापन आणि व्यवस्थापकीय अर्थशास्त्राची तत्त्वे,डेटा संरचना,इन्स्ट्रुमेंटेशन आणि मेट्रोलॉजी,द्रव शक्ती अभियांत्रिकी,मॉडेलिंग आणि सिम्युलेशन ,नियोजन आणि नियंत्रण,डेटाबेस व्यवस्थापन प्रणाली जर आपल्याला या क्षेत्रात यायचे असेल तर आपल्याला गणित, कॉम्प्युटर सायन्स, केमिस्ट्री आणि फिजिक्समध्ये बारावी पूर्ण केल्यानंतर, पदवीपूर्व अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते आणि पदवीस प्रवेश घ्यावा लागतो. बॅचलर पदवी पूर्ण केल्यानंतर,आपण पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश घेऊ शकतो.आणि नामांकित संस्थेमध्ये /कंपनी मध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवू शकतो.
- बायोमेडिकल इंजीनियरिंग-अभियांत्रिकीच्या प्रकारांपैकी पहिले म्हणजे बायोमेडिकल इंजिनियरिंग, या क्षेत्रात तुम्हाला जीवशास्त्र आणि अभियांत्रिकी या दोन्हीचा अभ्यास करण्याची संधी मिळेल, जसे की एक्स-रे बनवणे यंत्रे किंवा कृत्रिम शरीराचे अवयव इत्यादी शिकवले जातात. अशी यंत्रे बनवणे आणि त्यांची दुरुस्ती करणे आणि नवीन तंत्रज्ञान जगासमोर आणणे इत्यादी काम बायोमेडिकल इंजिनिअरचे असते बायोमेडिकल इंजीनियर ची पदवी घेतल्या नंतर कंपनी आणि आपल्या अनुभवानुसार 4 लाख ते 7 लाखा पर्यंत वार्षिक वेतन मिळू शकते.
- बायोटेक्नोलॉजी इंजीनियरिंग-अभियांत्रिकीच्या प्रकारांच्या यादीत पुढे जैवतंत्रज्ञान अभियांत्रिकी ही विज्ञानाची एक शाखा आहे जी जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र आणि अभियांत्रिकी यांचा समावेश करते. उपविषयांमध्ये अनुवंशशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, भ्रूणशास्त्र, जैवरसायनशास्त्र, रासायनिक अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान यांचा समावेश होतो. वस्त्रोद्योग, फार्मा, ऑटोमोबाईल, जैवउत्पादने, पोषण इत्यादींसारख्या विविध उद्योगांमध्ये ते अनुप्रयोग शोधते. बायोटेक्नॉलॉजी इंजिनीअरिंग कोर्स करण्याचा निर्णय जर आपण घेतलात, तर तुम्हाला आयआयटी जेईई/ एमएचटी -सीईटी यासारखी किंवा त्या -त्या कॉलेजची प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. तरच बीएससी इन बायोटेक्नॉलॉजी या कोर्सला तुम्हाला बारावीच्या गुणांवर प्रवेश मिळेल. बायोटेक्नॉलॉजी इंजीनियर ची पदवी घेतल्या नंतर कंपनी आणि आपल्या अनुभवानुसार क्षेत्रानुसार 3 लाखा पासून 7 लाखा पर्यंत वार्षिक पगार मिळू शकतो.
- मरीन इंजीनियरिंग-सागरी अभियंता हा एक प्रकारचा यांत्रिक अभियंता आहे जो जहाजे, नौका, पाणबुडी आणि इतर जलवाहिनी डिझाइन करतो. ते समुद्रमार्ग आणि इतर सागरी क्रियाकलापांशी संबंधित इतर संरचना, मशीन आणि तांत्रिक उपकरणे देखील तयार करतात. सागरी अभियंते फ्लुइड मेकॅनिक्स, हायड्रोलिक्स आणि इतर संकल्पनांच्या आधारे टिकाऊ जलवाहिन्या डिझाइन आणि बांधण्याचे काम करतात. ते इलेक्ट्रिकल, स्टीयरिंग, हवामान नियंत्रण, रडार आणि इंजिन प्रणाली एकत्र करून जहाजाला त्याच्या गंतव्यस्थानावर पोहोचण्यासाठी यशस्वीरित्या मार्गदर्शन करतात आणि पाण्यातील अडथळे टाळतात. यांचे कार्य मोठे जहाज किंवा डॉक्सवर अत्यंत महत्वाचे असते.
- पेट्रोलियम इंजीनियरिंग-इंजिनीअरिंग क्षेत्रात तुम्हाला यायचं असेल, तर ही पण शाखा आपण निवडू शकतो . आज पेट्रोल ,डीझेल, नैसर्गिक वायू हे आपल्या दैनंदिन जीवनाचे अविभाज्य भाग बनले आहेत. पृथ्वीच्या पृष्ठभागावरून तेल आणि नैसर्गिक वायू काढण्यासाठी विविध तंत्रे आणि पद्धतींची रचना आणि विकास करणाऱ्या तज्ञांना पेट्रोलियम अभियंता म्हणतात. पेट्रोलियम इंजिनीअरिंग हे क्षेत्र नवीन नाही तरी जास्त माहिती नसल्याने इतर शाखेच्या तुलनेने फार कमी विद्यार्थी ही इंजिनीअरिंगची शाखा निवडतात. तेल आणि वायूचे नैसर्गिक स्रोत शोधणं तसंच त्यांची तपासणी करण्याचं काम पेट्रोलियम इंजिनीअर्सना करावं लागतं. तेल, वायू बाहेर काढण्याच्या व त्यावर प्रक्रिया करण्याच्या कामात उपयुक्त पडतील अशी नवनवीन उपकरणं, यंत्रसामग्री शोधून काढणं/विकसित करण्याचं काम याच पेट्रोलियम इंजिनीअरला करावं लागतं. ही पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर करिअर करण्याची संधी मिळू शकते. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तेल कंपन्यांमध्ये पेट्रोलियम इंजिनीअरिंगची डिग्री घेतलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळतात.
- मेक्ट्रोनिक्स इंजीनियरिंग –ही अभियांत्रिकीची उप-शाखा आहे, जी प्रामुख्याने इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलचे संयोजन आहे. यात रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, संगणक आणि इतर अनेक घटकांचाही समावेश आहे. मेकॅट्रॉनिक्स अभियांत्रिकी जटिल, इलेक्ट्रिकल आणि सॉफ्टवेअर घटक एकत्र करण्यासाठी वापरली जाते. मेकॅट्रॉनिक्स अभियंते या सिस्टमची कार्यक्षमता वाढवतात. मेकॅट्रॉनिक्स इंजिनीअरिंग पूर्ण केल्यानंतर तुम्ही मेकॅट्रॉनिक्स आर्किटेक्ट, ऑटोमेशन इंजिनिअर, रिसर्च असिस्टंट इत्यादी म्हणून काम करू शकता.
वरील माहिती ही विविध माध्यमाचा अभ्यास करून इंजीनीयरीग महाविद्यालयाच्या प्राध्यापक यांच्याशी बोलून घेण्यात आली आहे यामध्ये काही बदल असू शकतो किंवा नोकरीच्या संधी कमी अधिक प्रमाणात असू शकतात वार्षिक वेतन कमी अधिक प्रमाणात असू शकते याची वाचक विद्यार्थी मित्रांनी नोंद घ्यावी हि विनंती. यात काही बदल असल्यास किंवा माहिती चूक वाटत असल्यास कृपया आमच्या सोबत इमेल द्वारे संपर्क साधावा. वरील माहिती द्वारे इंजीनियरिंग क्षेत्रातील विविध संधी बाबत ढोबळ माहिती देण्याचा केवळ प्रयत्न आहे.