महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे / कोकण / नागपूर / नाशिक छत्रपती संभाजीनगर / अमरावती विभागातील रचना सहायक (गट-ब) (अराजपत्रित), उच्चश्रेणी लघुलेखक (गट-ब) (अराजपत्रित), निम्नश्रेणी लघुलेखक (गट-य) (अराजपत्रित), संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदाचे नाव –रचना सहायक / उच्चश्रेणी लघुलेखक / निम्नश्रेणी लघुलेखक या (गट-ब) (अराजपत्रित)
वेतन भत्ते-
- रचना सहायक (गट-ब) (अराजपत्रित)- वेतन- S-14 (38600-122800) तसेच इतर अनुज्ञय भत्ते
- उच्चश्रेणी लघुलेखक (गट-ब) (अराजपत्रित)- वेतन- S-15 (41800-132300) तसेच इतर अनुज्ञय भत्ते
- निम्नश्रेणी लघुलेखक (गट-य) (अराजपत्रित)- वेतन- S-14 (38600-122800) तसेच इतर अनुज्ञय भत्ते
नियुक्ती- महाराष्ट्र राज्यात
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अ.क्र. | कार्यवाहीचा टप्पा | दिनांक व कालावधी |
1 | ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी | दिनांक 30 जुलै, 2024 रोजी 11.00 वाजल्यापासुन दिनांक 29 ऑगस्ट, 2024 रोजी 23.59 वाजेपर्यंत |
2 | ऑनलाईन पध्दतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक | दिनांक 30 ऑगस्ट, 2024 रोजी 23.59 वाजेपर्यंत |
3 | प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे | यावावत संकेतस्थळावर सूचना प्रसिध्द करण्यात येईल. |
4 | ऑनलाईन परीक्षेचा दिनांक | यावावत संकेतस्थळावर सूचना प्रसिध्द करण्यात येईल. |
1. रचना सहायक, उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक या तिन्ही पदांसाठी ऑनलाईन परीक्षा स्वतंत्रपणे स्वतंत्र
वेळापत्रकानुसार घेण्यात येतील. आवश्यकतेनुसार वरील वेळापत्रकामध्ये बदल झाल्यास त्याबाबत वेळोवेळी विभागाच्या
संकेतस्थळावर सूचना प्रसिध्द करण्यात येतील. अशा सूचनांचे वेळोवेळी अवलोकन करण्याची उमेदवारांनी दक्षता घ्यावयाची
आहे.
2. उमेदवारांच्या संख्येस अनुसरून आवश्यकतेनुसार वेगवेगळया सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात येतील
वयोमर्यादा :-
- उक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकास किमान वय 18 वर्षे पूर्ण असावे व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीयांसाठी / खेळाडूंसाठी / आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी / सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी वयोमर्यादा05 वर्षे शिथिलक्षम राहील.) तसेच दिव्यांग व अनाथ उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा 45 वर्षांपर्यंत शिथिलक्षम राहील.
- मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग आणि खेळाडू यांना असलेली वयोमर्यादेतील शिथिलतेची सवलत यापैकी कोणतीही अधिकतम असलेली एकच सवलत देय राहील.
परीक्षा शुल्क :-अराखीव (खुला) प्रवर्ग – 1000/- राखीव प्रवर्ग – 900/- उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.
- प्रस्तुत जाहिरात ही परीक्षे संदर्भातील संक्षिप्त जाहिरात असून अर्ज स्वीकारण्याची पद्धत, आवश्यक अर्हता, आरक्षण, वयोमर्यादा, परीक्षेच स्वरुप, परीक्षा शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, पदाची कर्तव्ये व जवाबदाऱ्या याबाबतचा सविस्तर तपशील दिनांक 30 जुलै, 2024 रोजी www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील “सर्वसाधारण सूचना” या सदरामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याचे कृपया अवलोकन करावे.
- भरती प्रक्रिया संदर्भातील सर्व कार्यक्रम, कार्यक्रमातील बदल, सूचना वगैरे www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील. उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नसून या संकेतस्थळावरुन माहिती उपलब्ध करुन घेण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावयाची आहे.
- स्पर्धात्मक परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, अंशतः बदल करणे, पदांच्या एकूण व संवर्गनिहाय संख्येमध्ये बदल करणे याबाबतचे सर्व अधिकार नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांना तसेच संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना राहतील व या संदर्भातील त्यांचा निर्णय अंतिम राहील. याबाबत कोणासही कोणताही दावा करता येणार नाही
अधिकृत संकेतस्थळ- www.dtp.maharashtra.gov.in
अर्ज भरण्यासाठी लिंक- https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/89027/Index.html
जाहिरात pdf-https://drive.google.com/file/d/14qRoB-ZSYrlHaS9pTExayDHTM5_6wzRF/view?usp=sharing
अधिक माहिती –https://drive.google.com/file/d/15i_ZgkgwqQmtrKEZcmbPtWIdVK4taDhC/view?usp=sharing
नोट- सदर पदासाठी अर्ज करताना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी तदनंतर अर्ज करण्यात यावा.