महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (Maharashtra State Power Distribution Company Limited) अंतर्गत एकूण पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी नमूद पदे भरण्यासाठी दि. 29/12/2023 रोजी कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिराती प्रसिध्द करण्यात आल्या होत्या. तसेच याबाबत विविध वर्तमानपत्रामध्ये प्रसिध्दी देण्यात आलेली होती.
ऑनलाईन अर्जाची नोंदणी करण्याकरीताची वेबलिंक (URL Link) कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली होती ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 20/03/2023 अशी दिलेली होती. तथापि, बहुतांश उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरीता मुदतवाढ देणेबाबत विनंती केल्याने ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 20/05/2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
पदाचे नाव : 1. विद्युत सहाय्यक 2.कनिष्ठ सहाय्यक (लेखा) 3 .पदवीधर शिकाऊ अभियंता (वितरण)/(स्थापत्य) 4.पदविकाधारक शिकाऊ अभियंता (वितरण)/(स्थापत्य)
शैक्षणिक पात्रता :-मुळ जाहिरात पाहावी.
वेतनमान :- नियमानुसार…
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख -: 20 मे 2024 (मुदतवाढसह)