SSC माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा मार्च २०२४ चा निकाल आज ०१.०० वाजता होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर सोमवार, दिनांक २७/०५/२०२४ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. परीक्षार्थी विद्यार्थ्यांना त्यांचा बैठक क्रमांक व इतर माहिती टाकून बोर्डाच्या संकेतस्थळा शिवाय इतर ठिकाणीही ऑनलाइन निकाल बघता येणार आहे. तरी निकाल पाहण्यात यावा. ——–BEST OF LUCK——

अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.

१. https://mahresult.nic.in

२. http://sscresult.mkcl.org

३. https://sscresult.mahahsscboard.in

४. https://results.digilocker.gov.in

५. https://results.targetpublications.org

६. https://www.tv9marathi.com

अधिक माहिती साठी मंडळाचे जाहीर प्रकटन खालीलप्रमाणे-

https://drive.google.com/file/d/1ZTeBznSW0SiK7KDDewNLQgXpkztPLUzV/view?usp=sharing

Scroll to Top