प्रस्तावना-सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 1911 मध्ये स्थापन झालेली पहिली भारतीय व्यावसायिक बँक आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक आहे बँकेच्या 4,500 हून अधिक शाखा असून शाखा नेटवर्क, 6,00,000 कोटींहून अधिक एकूण व्यवसायासह, 31,000 हून अधिक कर्मचाऱ्यांच्या वचनबद्ध कार्यशक्तीद्वारे चालविलेले, बँकेकडून अर्ज आमंत्रित केले आहे. अप्रेंटिस कायदा, 1961 अन्वये आणि बँकेच्या अप्रेंटिसशिप धोरणानुसार, शिकाऊ उमेदवारांच्या सहभागासाठी पात्र उमेदवार यांचे कडून अर्ज मागवीत आहे.
महत्वाचे-
- दि. 21.02.2024 च्या अधिसूचनेद्वारे 3000 शिकाऊ उमेदवारांच्या नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
- तथापि आता 6 जून ते 17 जून 2024 या कालावधीत शिकाऊ उमेदवारांच्या सहभागासाठी अर्ज विंडो पुन्हा उघडण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे.
- ज्या पात्र उमेदवारांनी यापूर्वी नोंदणी केली आहे परंतु फी भरू शकली नाही त्यांच्यासाठी देखील अर्जाची विंडो पुन्हा उघडली आहे.
- ज्या पात्र उमेदवारांनी FY 2024-25 साठी शिकाऊ उमेदवारीसाठी अर्ज केला आहे आणि फी भरली आहे त्यांनी पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही.
- सर्व उमेदवारांना पुढील माहिती साठी नियमितपणे बँकेच्या वेबसाइटला भेट देण्याचा सल्ला दिला आहे.
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतभर
एकूण अप्रेंटिस (Apprentice) पदसंख्या – 3000
वयाची अट: 31 मार्च 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
फीस बाबत- General/OBC: ₹800/-+GST [SC/ST/महिला: ₹600/-+GST, PWD: ₹400/-+GST]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक :- दि.17 जून 2024
परीक्षेचा दिनांक :- दि.23 जून 2024
सदर बाबतीत जाहिरात मधील माहिती कृपया काळजी पूर्वक वाचावी तदनंतर अर्ज करण्यात यावा.
बँक अधिकृत वेबसाईट –http://www.centralbankofindia.co.in/
अर्ज करण्यासाठी लिंक https://nats.education.gov.in/
मूळ जाहिरात लिंक समोर दिली कृपया जाहिरात डाऊनलोड करावी- https://drive.google.com/file/d/1nO2Apw-xvAvyAxDVAsrWXqWAIW62g8Oa/view?usp=sharing