स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये भरती

केंद्रीय भरती आणि पदोन्नती विभाग, कॉर्पोरेट केंद्र, मुंबई

जाहिरात क्रमांक: CRPD/CR/2026-27/17

ज्युनिअर असोसिएट (कस्टमर सपोर्ट अँड सेल्स) – लिपिक संवर्ग मेगा भरती २०२६

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ‘ज्युनिअर असोसिएट’ (क्लर्क) पदांच्या एकूण ७,६८० नियमित जागा आणि १,४४४ बॅकलॉग जागा (एकूण ९,१२४+ पदे) भरण्यासाठी पात्र भारतीय नागरिकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

महत्त्वाच्या तारखा (Important Dates):

  • ऑनलाईन अर्ज आणि शुल्क भरण्याची मुदत: ११.०८.२०२६ ते ३१.०८.२०२६
  • पूर्व परीक्षा (Preliminary Exam): सप्टेंबर २०२६ (संभाव्य)
  • मुख्य परीक्षा (Main Exam): नोव्हेंबर २०२६ (संभाव्य)

रिक्त जागांचा तपशील (Vacancies – महाराष्ट्र आणि गोवा):

  • महाराष्ट्र (मराठी भाषा Proficiency): नियमित: १,७१८ जागा | बॅकलॉग: २८१ जागा
  • गोवा (कोकणी भाषा Proficiency): नियमित: ६२ जागा | बॅकलॉग: १ जागा

पात्रता निकष (Eligibility Criteria):

  1. शैक्षणिक पात्रता (३१.१२.२०२६ रोजी): मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation). (पदवीच्या अंतिम वर्षात असणारे उमेदवारही अटींच्या अधीन राहून अर्ज करू शकतात).
  2. वयोमर्यादा (०१.०४.२०२६ रोजी): किमान २० वर्षे आणि कमाल २८ वर्षे.
    • जन्मतारीख ही ०२.०४.१९९८ पूर्वीची आणि ०१.०४.२००६ नंतरची नसावी.
  3. वयातील सवलत (Age Relaxation): OBC: ३ वर्षे | SC/ST: ५ वर्षे | PwBD (Gen): १० वर्षे.

वेतन आणि भत्ते (Salary & Emoluments):

  • सुरुवातीचे मूळ वेतन: ₹२६,७३०/- (पदवीधरांना मिळणाऱ्या दोन आगाऊ वेतनवाढींसह).
  • एकूण पगार: मुंबई/मेट्रो शहरात अंदाजे ₹४६,०००/- प्रति महिना (महागाई भत्ता आणि इतर भत्त्यांसह).

निवड प्रक्रिया (Selection Process):

  1. फेज-१: ऑनलाईन पूर्व परीक्षा (१०० गुण)
  2. फेज-२: ऑनलाईन मुख्य परीक्षा (२०० गुण)
  3. फेज-३: प्रादेशिक भाषा प्राविण्य चाचणी (LLPT) (ज्यांनी १० वी किंवा १२ वी मध्ये स्थानिक भाषा अभ्यासली आहे त्यांना या चाचणीतून सूट मिळेल).

अर्ज शुल्क (Application Fee):

  • General / OBC / EWS: ₹७५०/-
  • SC / ST / PwBD / XS / DXS: मोफत (Nil)

अर्ज कसा करावा? (How to Apply):

इच्छुक उमेदवारांनी एसबीआयच्या अधिकृत कारकीर्द पोर्टल SBI Careers वर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी. अर्जासोबत फोटो, स्वाक्षरी, डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा आणि हस्तलिखित घोषणापत्र अपलोड करणे अनिवार्य आहे.

अधिकृत संकेतस्थळ: sbi.bank.in/web/careers

Scroll to Top