IBPS बँक लिपिक (CSA) महाभरती २०२६

  • अर्ज सुरू होण्याची तारीख: ०१ ऑगस्ट २०२६
  • ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याची अंतिम तारीख: २८ ऑगस्ट २०२६ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत)
  • पूर्व परीक्षा (Prelims Exam): १० आणि ११ ऑक्टोबर २०२६
  • मुख्य परीक्षा (Mains Exam): २७ डिसेंबर २०२६
  • पदाचे नाव: कस्टमर सर्व्हिस असोसिएट (Customer Service Associate – CSA / Clerk)
  • एकूण जागा: ११,४०३ जागा (संपूर्ण भारतात, राज्यनिहाय जागा उपलब्ध)

१. बँक ऑफ बडोदा (BOB)
२. बँक ऑफ इंडिया (BOI)
३. बँक ऑफ महाराष्ट्र (BOM)
४. कॅनरा बँक
५. सेंट्रल बँक ऑफ इंडिया
६. इंडियन बँक
७. इंडियन ओव्हरसीज बँक
८. पंजाब नॅशनल बँक (PNB)
९. पंजाब अँड सिंध बँक
१०. युको बँक (UCO)
११. युनियन बँक ऑफ इंडिया

१. शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

  • पदवी: मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation Degree) उत्तीर्ण असावी.
  • भाषा ज्ञान: उमेदवार ज्या राज्यासाठी अर्ज करत आहे, त्या राज्याची स्थानिक भाषा (उदा. महाराष्ट्रासाठी मराठी) बोलता, लिहिता आणि वाचता येणे आवश्यक आहे.
  • संगणक ज्ञान: संगणक चालवण्याचे ज्ञान (Certificate/Diploma/Degree) किंवा शालेय/कॉलेज पातळीवर संगणक विषय घेतलेला असावा.
  • किमान वय: २० वर्षे
  • कमाल वय: २८ वर्षे
  • वयातील सूट (नियमनुसार):
    • SC / ST उमेदवार: ०५ वर्षे सूट
    • OBC (NCL) उमेदवार: ०३ वर्षे सूट
    • PwBD (दिव्यांग) उमेदवार: १० वर्षे सूट
  • SC / ST / PwBD / माजी सैनिक: ₹१७५/-
  • सर्व इतर प्रवर्ग (General / OBC / EWS): ₹८५०/-
  • शुल्क भरणे ऑनलाईन पद्धतीने (Net Banking/Credit/Debit Card/UPI) करायचे आहे.

  • निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा अंदाजे ₹२४,०५०/- ते ₹६४,४८०/- या वेतनश्रेणीनुसार पगार व इतर भत्ते दिले जातील.

या भरतीमध्ये कोणतीही मुलाखत (Interview) नाही. निवड केवळ दोन टप्प्यांत होईल:

  1. ऑनलाईन पूर्व परीक्षा (Preliminary Exam): १०० गुण (पात्रतेसाठी)
  2. ऑनलाईन मुख्य परीक्षा (Main Exam): २०० गुण (या गुणांवर अंतिम गुणवत्ता यादी ठरेल)
  3. स्थानिक भाषा चाचणी (Local Language Test): (१०वी/१२वी मध्ये स्थानिक भाषा विषय नसलेल्यांसाठी)
  1. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम IBPS अधिकृत वेबसाईट वर जा.
  2. “CRP-Clerks (CRP CSA-XVI)” या लिंकवर क्लिक करून नवीन नोंदणी (New Registration) करा.
  3. सर्व वैयक्तिक व शैक्षणिक माहिती अचूक भरा.
  4. फोटो, स्वाक्षरी, डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा आणि हस्तलिखित घोषणापत्र (Handwritten Declaration) अपलोड करा.
  5. परीक्षा शुल्क ऑनलाईन भरा आणि अर्जाची प्रिंट काढून ठेवा