बँक ऑफ बडोदा LBO भरती 2026

Bank of Baroda LBO Recruitment 2026: बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर उमेदवारांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. Bank of Baroda (BOB) अंतर्गत Local Bank Officer (LBO) पदांसाठी तब्बल 2,482 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 18 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 सप्टेंबर 2026 आहे.

भरतीचा संक्षिप्त आढावा

घटकमाहिती
🏦 बँकेचे नावBank of Baroda
💼 पदाचे नावLocal Bank Officer (LBO)
📊 एकूण पदे2,482
📍 महाराष्ट्रातील पदे218
🎓 शैक्षणिक पात्रताकोणत्याही शाखेतील पदवी
👤 वयोमर्यादा21 ते 30 वर्षे
📅 वयाची गणना1 ऑगस्ट 2026
💰 वेतनश्रेणी₹48,480 – ₹85,920
🗣️ महाराष्ट्राची स्थानिक भाषामराठी
📝 अर्ज पद्धतीऑनलाइन
🗓️ अर्ज सुरू18 ऑगस्ट 2026
⏰ अंतिम तारीख7 सप्टेंबर 2026
🏷️ जाहिरात क्रमांकBOB/HRM/REC/ADVT/2026/16

अधिकृत जाहिरातीनुसार हे पद Junior Management Grade/Scale-I (JMG/S-I) अंतर्गत आहे.

राज्यनिहाय पदांची माहिती

या भरतीमध्ये विविध राज्यांसाठी स्थानिक भाषेनुसार पदे निश्चित करण्यात आली आहेत.

राज्यस्थानिक भाषाएकूण जागा
आंध्र प्रदेशतेलुगू80
अरुणाचल प्रदेशइंग्रजी20
आसामआसामी / बोडो40
गोवाकोंकणी21
गुजरातगुजराती1,185
जम्मू आणि काश्मीरउर्दू / काश्मीरी / डोगरी15
कर्नाटककन्नड418
केरळमल्याळम49
महाराष्ट्रमराठी218
मणिपूरमणिपुरी / मैतेई15
मेघालयगारो / खासी15
मिझोराममिझो15
नागालँडइंग्रजी15
ओडिशाओडिया100
पंजाबपंजाबी34
सिक्कीमनेपाळी / सिक्कीमी10
तामिळनाडूतमिळ132
तेलंगणातेलुगू50
त्रिपुराबंगाली / कोकबोरोक8
पश्चिम बंगालबंगाली / नेपाळी42

एकूण : 2,482 पदे. अधिकृत जाहिरातीत काही राज्यांसाठी नवीन तसेच मागील भरतीतील unfilled vacancies समाविष्ट आहेत.

महाराष्ट्रातील 218 जागांचे आरक्षण

महाराष्ट्रासाठी मराठी ही स्थानिक भाषा असून एकूण 218 पदे उपलब्ध आहेत.

नवीन पदे – 180

प्रवर्गजागा
SC28
ST12
OBC51
EWS18
GEN71
एकूण180

याशिवाय मागील LBO भरती प्रक्रियेतील 38 रिक्त पदे महाराष्ट्रासाठी दाखवण्यात आली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण उपलब्ध पदसंख्या 218 होते.

शैक्षणिक पात्रता

उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation in any discipline) असणे आवश्यक आहे.

पदवी ही भारत सरकार/संबंधित नियामक संस्थांनी मान्य केलेल्या विद्यापीठ किंवा संस्थेतून प्राप्त केलेली असावी.

अतिरिक्त प्रमाणपत्रे

खालील प्रमाणपत्रे Preferred Certifications म्हणून जाहिरातीत नमूद आहेत:

  • IC 38 – Insurance Institute of India
  • NISM Series V-A – Mutual Fund Distributors Certification
  • NISM Series XXI-A – Portfolio Management Services Distributors Certification
  • NISM Series XIII – Common Derivatives Certification

ही प्रमाणपत्रे प्राधान्याची आहेत; मूलभूत पात्रतेसाठी पदवी आवश्यक आहे.

अनुभवाची अट

ही बाब उमेदवारांनी विशेष लक्षात घेणे आवश्यक आहे.

उमेदवाराकडे 1 ऑगस्ट 2026 रोजी किमान 1 वर्षाचा Post-Qualification Experience असणे आवश्यक आहे.

हा अनुभव RBI च्या Second Schedule मध्ये नमूद Scheduled Commercial Bank मध्ये Officer म्हणून असावा.

Clerical cadre मधील अनुभव पात्रतेसाठी ग्राह्य धरला जाणार नाही. अनुभवाचे प्रमाणपत्र/Job Profile संबंधित विद्यमान किंवा पूर्वीच्या नियोक्त्याकडून सादर करावे लागेल.

वयोमर्यादा

1 ऑगस्ट 2026 रोजी:

  • किमान वय : 21 वर्षे
  • कमाल वय : 30 वर्षे

वयामध्ये सवलत

प्रवर्गकमाल वयातील सवलत
SC/ST5 वर्षे
OBC (Non-Creamy Layer)3 वर्षे
PwBD – General/EWS10 वर्षे
PwBD – OBC13 वर्षे
PwBD – SC/ST15 वर्षे
पात्र Ex-Servicemenनियमानुसार 5/8/10 वर्षे

OBC उमेदवारांनी Central List मध्ये असणे आणि Non-Creamy Layer निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.

स्थानिक भाषा अनिवार्य

उमेदवाराने ज्या राज्यासाठी अर्ज केला आहे त्या राज्याची स्थानिक भाषा वाचता, लिहिता, बोलता आणि समजता येणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रासाठी

मराठी भाषा अनिवार्य आहे.

ऑनलाइन परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना Local Language Proficiency Test (LPT) द्यावी लागू शकते.

मात्र उमेदवाराने 10वी किंवा 12वीच्या गुणपत्रिका/प्रमाणपत्रात संबंधित स्थानिक भाषा विषय म्हणून शिकल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यास LPT मधून सूट मिळू शकते.

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाऊ शकते:

  1. Online Examination
  2. Local Language Proficiency Test (LPT)
  3. Group Discussion / Personal Interview
  4. Psychometric Test किंवा बँकेने ठरवलेली अन्य चाचणी, आवश्यक असल्यास

बँकेला निवड प्रक्रियेत बदल, अतिरिक्त चाचणी किंवा मुलाखतीच्या पद्धतीत बदल करण्याचा अधिकार आहे.

ऑनलाइन परीक्षेचे स्वरूप

अधिकृत जाहिरातीनुसार ऑनलाइन परीक्षेची तात्पुरती रचना पुढीलप्रमाणे आहे:

विषयप्रश्नगुणवेळ
English Language303030 मिनिटे
Banking Knowledge303030 मिनिटे
General / Economic Awareness303030 मिनिटे
Reasoning Ability & Quantitative Aptitude303030 मिनिटे
एकूण120120120 मिनिटे

English Language वगळता इतर विभाग English आणि Hindi मध्ये उपलब्ध असतील.

English Language विभाग फक्त qualifying nature चा असून त्यातील गुण अंतिम गुणवत्ता यादीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत.

❌ Negative Marking

चुकीच्या उत्तरासाठी त्या प्रश्नाच्या गुणांच्या 25% गुणांची कपात केली जाईल.

प्रश्न सोडला आणि उत्तर दिले नाही तर त्यासाठी नकारात्मक गुणांकन होणार नाही.

अर्ज शुल्क

उमेदवारअर्ज शुल्क
General / EWS / OBC₹850 + Payment Gateway Charges
SC / ST / PwBD / ESM/DESM / महिला₹175 + Payment Gateway Charges

अर्ज शुल्क Non-Refundable आहे.

वेतन

LBO पदासाठी वेतनश्रेणी:

₹48,480 – ₹85,920

Scale-I च्या वेतनरचनेनुसार मूलभूत वेतन पुढीलप्रमाणे वाढते:

₹48,480 → ₹62,480 → ₹67,160 → ₹85,920

याशिवाय बँकेच्या नियमानुसार विविध allowances, benefits, perquisites आणि इतर सुविधा मिळू शकतात.

नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या उमेदवाराची नियुक्ती त्याने ज्या राज्यासाठी अर्ज केला आहे त्या राज्यात पहिली 12 वर्षे किंवा SMGS-IV Grade पर्यंत पदोन्नती होईपर्यंत, यापैकी जे आधी होईल तोपर्यंत केली जाईल.

त्यानंतर बँकेच्या गरजेनुसार भारतातील कोणत्याही शाखेत/कार्यालयात बदली होऊ शकते.

महत्त्वाच्या तारखा

कार्यक्रमतारीख
जाहिरात क्रमांकBOB/HRM/REC/ADVT/2026/16
ऑनलाइन अर्ज सुरू18 ऑगस्ट 2026
अर्ज व शुल्क भरण्याची अंतिम तारीख7 सप्टेंबर 2026
ऑनलाइन परीक्षेची तारीखनंतर जाहीर केली जाईल

अर्ज कसा करावा?

  1. Bank of Baroda च्या अधिकृत Career वेबसाइटवर जा.
  2. Current Opportunities विभाग उघडा.
  3. Recruitment of Local Bank Officers – BOB/HRM/REC/ADVT/2026/16 ही जाहिरात निवडा.
  4. Apply Now वर क्लिक करा.
  5. ऑनलाइन Registration करा.
  6. वैयक्तिक, शैक्षणिक व अनुभवाची माहिती भरा.
  7. आवश्यक कागदपत्रे/फोटो/स्वाक्षरी इत्यादी अपलोड करा.
  8. अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरा.
  9. अर्ज Submit करून Application Form ची प्रत जतन करा.

एक उमेदवार फक्त एका राज्यासाठी अर्ज करू शकतो. एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास शेवटचा वैध पूर्ण अर्ज ग्राह्य धरला जाईल आणि इतर अर्जांचे शुल्क जप्त होऊ शकते.

अधिकृत जाहिरात आणि अर्ज

Bank of Baroda ची अधिकृत भरती जाहिरात: BOB LBO Recruitment 2026 – Official Advertisement

ऑनलाइन अर्ज: Apply Online – Bank of Baroda LBO 2026