
राज्य पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्यामुळे गृह विभागाकडून २०,००० ते २४,००० हून अधिक जागांसाठी नवीन मेगा भरतीची प्रक्रिया सुरू करण्याबाबत हालचाली वेगाने सुरू आहेत. या भरती प्रक्रियेच्या नियोजनासाठी ९ सप्टेंबर २०२६ रोजी महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे, ज्यानंतर अधिकृत वेळापत्रक आणि जाहिरात स्पष्ट होईल
अपेक्षित पदसंख्या आणि पदे (Expected Vacancies) या भरती अंतर्गत प्रामुख्याने खालील पदांचा समावेश असेल
पोलीस शिपाई (Police Constable)
पोलीस शिपाई चालक (Police Constable Driver)
राज्य राखीव पोलीस बल (SRPF) जवान
कारागृह शिपाई (Prison Constable)
पोलीस बँड्समन (Bandsman)
२. शैक्षणिक पात्रता (Eligibility Criteria)
- पोलीस शिपाई / चालक / SRPF: मान्यताप्राप्त मंडळाची १२ वी उत्तीर्ण (Higher Secondary) परीक्षा पास असणे आवश्यक आहे.
- चालक पदासाठी: उमेदवाराकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स (LMV) असणे अनिवार्य आहे
३. वयोमर्यादा (Age Limit)
- खुला प्रवर्ग (General): १८ ते २८ वर्षे.
- मागासवर्गीय प्रवर्ग (Caste Categories): १८ ते ३३ वर्षे (नियमांनुसार वयात सवलत दिली जाते).
५. निवड प्रक्रिया (Selection Process)
महाराष्ट्र पोलीस भरतीची निवड प्रक्रिया दोन मुख्य टप्प्यांत पार पडते
शारीरिक चाचणी (Physical Test – ५० गुण): यामध्ये धावणे (Running), गोळाफेक (Shot Put) इत्यादींचा समावेश असतो. लेखी परीक्षेला बसण्यासाठी या चाचणीत किमान ५०% गुण मिळवणे आवश्यक असते.
लेखी परीक्षा (Written Exam – १०० गुण): शारीरिक चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाते. यामध्ये मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान (GK) या विषयांवर आधारित बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात.
उमेदवारांनी तयारी सुरू ठेवावी
नवीन भरतीची अधिकृत जाहिरात कधी प्रसिद्ध होईल, याबाबत स्पष्ट वेळापत्रक जाहीर होईपर्यंत उमेदवारांनी प्रतीक्षा न करता मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेची तयारी सुरू ठेवणे फायदेशीर ठरणार आहे.
महत्त्वाचे : सध्या उपलब्ध अधिकृत माहितीनुसार 23,320 रिक्त पदांचा आकडा समोर आला आहे; मात्र या सर्व पदांसाठी नवीन भरतीची अधिकृत जाहिरात अद्याप जाहीर झालेली नाही. भरतीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर पदनिहाय आणि प्रवर्गनिहाय तपशील स्पष्ट होईल. त्यावेळी या ठिकाणी जाहिरात देण्यात येईल
तयारी चालू ठेवा हार मानू नका आपले स्वप्न साकार होणार आहे
