High court Bombay – मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नागपूर खंडपीठ येथे “वाहनचालक” ( Staff Car Driver ) पदाची भरती

अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक- 03/07/2024 5 PM पर्यंत

High court Bombay – मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाच्या आस्थापनेवर “वाहनचालक” या पदाची सद्यःस्थितीत रिक्त असणारी ५ पदे व पुढील २ वर्षात रिक्त होणारी ३ पदे, अशा एकूण ८ पदांकरिता उमेदवारांची निवड यादी आणि ०२ उमेदवारांची प्रतिक्षा यादी तयार करण्यास परवानगी मिळालेली आहे. यासाठी, ही जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकाला, खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या. निरोगी, इछुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत त्यासंदर्भात निवड यादी व प्रतिक्षा यादी ही प्रसिध्दीच्या दिनांकापासून 2 वर्षासाठीच वैध राहील सदर पदभरती बाबत ,मुंबई उच्च न्यायालयाच्या संकेत स्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या करिता जाहिरात वाचून अर्ज करण्यात यावेत.

पदाचे नाव – “वाहनचालक ”( Staff Car Driver )

पदसंख्या – 08 जागा

अर्ज करण्याची अंतिम दिनांक- 19/06/2024 to 03/07/2024 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करण्यात यावेत.

शैक्षणिक पात्रता/वयोमर्यादा खालील प्रमाणे-

प्रवर्गकिमान वयोमर्यादा कमाल वयोमर्यादा
खुला प्रवर्ग21 वर्ष38 वर्ष
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर मागासवर्गीय प्रवर्ग किंवा विशेष मागास वर्ग21 वर्ष43 वर्ष
उच्च न्यायालय / शासकीय कर्मचारी ( विहित मार्गाने अर्ज करणारे )21 वर्षलागू नाही
2) उमेदवार कमीत कमी एस.एस.सी (दहावी) किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा
3) उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
4) उमेदवाराकडे मोटर वाहन अधिनियम १९८८ एक ५९/१९८८) प्रमाणे वैध व प्रभावीपणे कार्यरत असा किमान हलके मोटार
वाहन (LMV) चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) अर्ज सादर केल्याच्या दिनांकापासून असावा
5) अर्ज करण्याच्या तारखेस उमेदवाराजवळ किमान ३ वर्ष हलके आणि किंवा जड मोटर वाहन चालविण्याचा अनुभव असावा
6) उमेदवाराचा पूर्व कार्यकाळ (रेकोर्ड) वाहन चालक म्हणून स्वच्छ असावा
7) उमेदवारास मोटर वाहनाची देखभाल व सर्वसाधारण दुरुस्तीचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
8) उमेदवारास नागपूर शहराची प्रादेशिक रचना (Topography) याची माहिती असावी.
9) उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम, सुदृढ आणि निर्व्यसनी असावा
10) चारचाकी मोटार वाहनाची देखभाल आणि किरकोळ दुरुस्ती या दोन्हीचा अधिकतम अनुभव आणि कार्यरत ज्ञान असणे
आवश्यक आहे.
11) निवड झालेल्या उमेदवारांची प्रथम वैद्यकीय चाचणी केली जाईल, सक्षम प्राधिका-याने वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असल्याचे
प्रमाणित केल्यावरच त्याची नियुक्ती करण्यात येईल

वेतन भत्ते -: पे स्केल एस-10- रु.29200 – रु.92300/- तसेच नियमांनुसार इतर भत्ते

अर्ज पद्धती –ऑनलाईन (टीप-ऑनलाइन अर्ज केल्या नंतर सदरील अर्ज आणि शैक्षणिक कागदपत्र कार्यालयात पाठवू नयेत )

नोकरीचे ठिकाण- मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नागपूर खंडपीठ नागपूर

फीस- रु. 200 /-

अधिकृत वेबसाईट https://bombayhighcourt.nic.in/index.php

मूळ जाहिरातhttps://drive.google.com/file/d/1fLB6geH7rzUpnOmPheympvepQr9t0UgF/view?usp=sharing

सदर पदाबाबत सविस्तर शैक्षणिक पात्रता आणि अधिक माहिती कृपया काळजी पूर्वक वाचावी.

Scroll to Top