समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग-३ संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल / अधिक्षक (महिला), गृहपाल / अधिक्षक (सर्वसाधारण), समाज कल्याण निरिक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या संवर्गातील खालील तक्त्यात नमुद केलेली रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता सदर पदासाठी आवश्यक असलेली अर्हता / पात्रता धारण करीत असलेल्या पात्र इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत
अ.क्र | पदाचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, | 05 |
02 | गृहपाल / अधिक्षक (महिला), | 92 |
03 | गृहपाल / अधिक्षक (सर्वसाधारण), | 61 |
04 | समाज कल्याण निरिक्षक, | 39 |
05 | उच्चश्रेणी लघुलेखक, | 10 |
06 | निम्न श्रेणी लघुलेखक | 03 |
07 | लघुटंकलेखक | 09 |
महत्वाचे-
- अर्ज फक्त ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
- ऑनलाईन परीक्षेचा दिनांक https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल
अर्ज सादर करण्यांचा कालावधी दिनांक 10.10.2024 रोजी 17.00 वाजल्यापासून दिनांक 11.11.2024 रोजी 23.59 वाजेपर्यंत राहील.
- अर्ज सादर करण्याकरीता संकेतस्थळ – https://sjsa.maharashtra.gov.in
- वरील संकेतस्थळा वरील बातम्या (News) / महत्वाची संकेतस्थळे (USEFUL LINKS) मध्ये समाज कल्याण पदभरती 2024 / social welfare recruitment 2024 असे आहे.