B.M.C. बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “कार्यकारी सहायक” 1846 पदांची महा भरती

  • मा. महानगरपालिका आयुक्त यांच्या मंजुरी क्र.एमजीएफ/एफ/3604 दि.24.06.2024 नुसार, बृहन्मुंबई महानगर पालिकेतील विविध खात्याच्या आस्थापनेवरील गट-क मधील “कार्यकारी सहायक” (पूर्वीचे पदनामः लिपिक) या संवर्गातील खालील तक्त्यात नमूद केलेली 1846 रिक्त पदे सरळसेवेने भरावयाची आहेत.
  • सदर पदासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcam.gov.in/for prospects/Careers-All/Recruitment/Chief Personnel Officer या संकेतस्थळावर प्रस्तृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता/पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • उमेदवारांनी वरील नमूद संकेतस्थळावर ‘कार्यकारी सहायक (पूर्वीचे पदनामः लिपिक) पदाकरिता ऑनलाईन अर्ज’ या लिंकवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज विहित मुदतीत सादर करावेत.
  • “कार्यकारी सहायक” (पूर्वीचे पदनामः लिपिक) या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतः खात्री करावयाची आहे की, ते अर्ज करीत असलेल्या पदासाठी विहित अर्हता / अटीची पूर्तता करीत असून सदर पदाकरिता ते पात्र आहेत.
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध (Valid) ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे. भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने देण्यात येणार असल्याने, भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.

पदाचे नाव:-“कार्यकारी सहायक” (पूर्वीचे पदनामः लिपिक)

  • वेतनश्रेणी (सुधारित):- स्तर-M15- रू. 25,500-81,100
  • भरावयाच्या रिक्त पदांची संख्या :-1846
  • गट:- “क”

New advertisement in pdf – https://drive.google.com/file/d/1_1_swLpi3ScfDwZpYt5DzUnddylP90uN/view?usp=sharing

old advertisement pdf-https://drive.google.com/file/d/1qxMN3HURtb7gChrsgtQ5ebJJAzcRhjYm/view?usp=sharing

अधिकृत संकेत स्थळhttps://www.mcgm.gov.in/