राज्य शासनाच्या अखत्यारितील सर्व शासकीय कार्यालयातील गट-ब (अराजपत्रित) व गट-क (वाहन चालक वगळून) संवर्गातील पदे सरळसेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणार
अधिक माहितीसाठी शासन निर्णय-
नमस्कार –
आज ग्रामीण भागात शिक्षणाचे महत्व माहित झाले असून ग्रामीण भागातील बहुतांश तरुण तरुणी हे शिक्षण घेण्याकडे वळाले आहेत बहुतांश खेड्यामध्ये दहावी पर्यन्त शाळा असल्यामुळे ग्रामीण भागात दहावी पर्यंत शिक्षण होऊन जाते खरी परीक्षा दहावी पास झाल्या नंतर येते कारण दहावी नंतर कोणत्या क्षेत्रात शिक्षण घ्यायचे या बाबत ग्रामीण भागातील युवक गोंधळून गेलेले असतात. घरातील पालक सुशिक्षित असतील तर असा प्रश्न उपस्थित होत नाही मात्र ज्या कुटुंबात आई वडील किंवा घरातील इतर मंडळी सुशिक्षित नसतील तर दहावी नंतर कोणत्या क्षेत्रात शिक्षण घ्यावे म्हणजे आपले करिअर घडेल याबाबत निर्णय घेणे अवघड होऊन बसते यामुळे ऐनवेळी कोणत्या तरी एखाद्या शाखेत प्रवेश घेऊन शिक्षण सुरु होते काही दिवस गेले नंतर लक्षात येते आपण घेत असलेले शिक्षणामध्ये पुढे करिअरच्या संधी कमी आहेत किंवा आपले या क्षेत्रात मन लागत नाही. आपल्याला हे करायचे यामुळे शिक्षण घेत असताना आपला मार्ग चुकू शकतो. माझे ही तसेच झाले दहावी नंतर अकरावी क्षेत्र निवड करताना मार्ग चुकला आणि यामुळे आयुष्यात बऱ्याच अडचणींना सामना करावा लागला. यामुळे आपल्याला योग्य करिअर क्षेत्र निवड करणेसाठी या ब्लॉगच्या माध्यमातून दहावी नंतर करीअरच्या संधी विषयी माहिती देण्यात येणार आहे. यामुळे करिअर मार्ग निवड करताना नक्की मदत होईल ही अपेक्षा आहे.
तसेच या ब्लॉगच्या माध्यमातून नोकरी विषयक जाहिराती विषयी माहिती देण्यात येणार आहे. शिक्षण घेतल्या नंतर कधी जाहिरात येते कधी अर्ज भरावेत याविषयी माहिती मिळाल्यास बेरोजगार बांधवाना रोजगार विषयक संधी शोधणे सहज शक्य होईल. या माध्यमातून युवक युवतींना सरकारी नोकरी व स्पर्धा परीक्षेत जास्तीत-जास्त संख्येने सहभागी होण्याकरिता उपलब्ध असलेल्या संधी त्यांच्यापर्यंत पोहचवून ध्येयापर्यंत जाण्याचा मार्ग सुकर होईल.
या ब्लॉग च्या माध्यमातून काही तरी नवीन चांगले घडवण्याची आमचा मानस आहे. माझे शिक्षण एम ए. बि.एड पर्यंत झालेले असून मी ग्रामीण भागातून माझे शिक्षण पूर्ण केले. काही संधी वेळेत शोधता आल्या नाही यामुळे आयुष्य जगत असताना अडचणी समोर आल्या. पण यामुळे परिस्थितीने काहीतरी वेगळे करण्याची प्रेरणा दिली . आपल्याला योग्य करीअर क्षेत्र निवडताना कोणी मार्गदर्शक नव्हता किंवा नोकरीच्या संधी जाहिराती विषयी माहिती कोणी संगीतली नाही म्हणून वाईट वाटून घेण्यात काही अर्थ नाही. यामुळे या ब्लॉगच्या माध्यमातून आपण करीअर निवडणेचे मार्ग आणी नोकरी विषयक संधी जाहिराती प्रशिद्ध करणार आहोत याचा नक्कीच विद्यार्थी आणि बेरोजगार बांधव यांना लाभ होणार आहे अशी अपेक्षा याद्वारे व्यक्त करतो
धन्यवाद !!