आधुनिक भारताचा इतिहास प्रकरण -2 |
सन 1857 चा उठाव |
अ.क्र | प्रश्न | उत्तर |
01 | सन 1857 च्या उठावाची पार्श्वभूमी | सन 1857 चा उठाव हा भारतीय इतिहासामधील महत्वाची घटना आहे 29 मार्च 1857 रोजी बराकपूर लष्करी छावणीतील मंगल पांडे यांनी इंग्रज अधिकारी मेजर ह्युसेन वर गोळी झाडली आणि बंडास सुरवात झाली लवकरच हा उठाव उत्तर व मध्य भारतातील अनेक ठिकाणी पसरला. या लढ्यास 1857 चे स्वातंत्र्य समर, पहिला भारतीय स्वातंत्र्य लढा, शिपाई बंडाळी अशा इतर नावांनीही ओळखला जातो. |
सन 1857 च्या उठावाची कारणे |
01 | राजकीय कारणे | लॉर्ड वेलस्ली ची तैनाती फौज- लॉर्ड वेलस्ली यांनी तैनाती फौजेची योजना आणली होती आणि यामध्ये सैन्य संस्थानिक यांच्या ताब्यात असे मात्र त्यांचे मालक इंग्रज होते. |
लॉर्ड डलहौसी द्वारा दत्तक वारसा नामंजूर करण्यात आले यामध्ये सातारा-1848 संबळपूर-1849 नागपूर-1853 झांशी-1853 इत्यादी संस्थाने खालसा करून इस्ट इंडिया कंपनीच्या समाज्यात सामील केली. |
लॉर्ड डलहौसीने दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या मृत्यू नंतर त्याचा दत्तक पुत्र नानासाहेब पेशवे यांना पेन्शन देणे बंद केले. |
सन 1859 मध्ये लॉर्ड डलहौसी भारतीय चलनावरील मुघल बादशाहाचे नाव काढून टाकले यामुळे लोक नाराज होते. |
बहादूरशहा जफर यांच्या मृत्युनंतर त्यांच्या वारसांना लाल किल्ला सोडवा लागेल असे लॉर्ड डलहौसी यांनी सांगितले. |
सन 1856 मध्ये लॉर्ड कॅनिंग यांनी सांगितले कि बहादूर शहा जफर नंतर त्यांच्या मुलांना वारसांना बादशहा ही पदवी लावता येणार नाही. |
तसेच 1856 मध्ये कूप्रशासनाच्या आधारे अवधचे संस्थान विलीन केले. |
02 | सामाजिक व धार्मिक कारणे- | लॉर्ड विल्यम बेंटिकने 1829 मध्ये सतीप्रथा कायद्याने बंद केली. व लॉर्ड डलहौसीने सन 1856 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा पास केला. या दोन्ही घटना कर्मठ जुन्या विचारांच्या भारतीयाना ब्रिटीश आपल्या धर्मात हस्तक्षेप करिता असल्याचे व आपला धर्म बाटविण्याचा प्रकार करीत आहेत असे वाटले. |
सन 1850 अगोदर जर एखाद्याने धर्म परिवर्तन केले तर त्याचा त्यांच्या वडिलांच्या संपतीवर काहीच हक्क नव्हता. मात्र सन 1850 चा लेक्श लोके नवीन कायद्या मुळे धर्मांतरित व्यक्तीस वडिलांच्या संम्पतीवर हक्क प्राप्त झाला होता. |
03 | प्रशासकीय आणि आर्थिक करणे- | प्रशासनात भारतीय नागरिकांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळत असे भारतीय लोकासाठी प्रशासनात अमीन हे सर्वोच्च पद होते तर लष्करामध्ये सुभेदार हे सर्वोच्च पद होते या पदाच्या पुढील पदे भारतीय नागरिकांना घेण्यात येत नव्हते. इंग्रज नोकरदार आणि भारतीय नोकरदार हे एकाच पदावर असले तरी भारतीय नोकरदारांना इंग्रज नोकरदाराच्या तुलनेत कमी पगार मिळत असे. भारतीयांना उच्च पदावर काम करता येत नव्हते यामुळे एक प्रकारे असंतोष निर्माण झालेला होता. |
04 | लष्करी कारणे- | सन 1824 मध्ये बराकपूर छावणीतील सैनिकांनी ब्रह्मदेशात समुद्र पार करून जाण्यास नकार दिला मात्र इंग्रज त्यांना बळजबरीने दुसऱ्या देशात समुद्री मार्गे जाण्यास भाग पाडत असत त्यावेळी समुद्र पार करून जाणे अशुभ मानले जात असे.आणि इंग्रज अधिकारी समुद्र मार्गे जाण्यास भाग पाडीत असत. |
सन 1839 ते 1842 या तीन वर्षाच्या कालावधीत भारतीय सैनिकांनीअफगाणिस्थानात लष्करी सेवा दिली होती. त्यानंतर भारतीय सैनिक जेव्हा परत आले तेव्हा भारतातील लोकांनी त्यांना स्वताच्या जातीमध्ये घेण्यास नकार दिला यामुळे या सैनिकामध्ये वेगळी भावना निर्माण झाली. |
सन 1856 मध्ये भारतीय सैनिकाकडे ब्राऊन बेस नावाच्या लोखंडी बंदुका होत्या. मात्र ईस्ट इंडिया कंपनीने आपल्या सैनिकांना नवीनच इनफिल्ड जातीच्या बंदुका पुरविल्या या बंदुकीमध्ये वापरण्यात येणाऱ्या काडतुसांवर गायीची व डूकरांची चरबी लावली होती या बातमीमुळे भारतीय सैनिंकामध्ये असंतोष पसरला. गाय हि हिंदू सैनिकांना पवित्र तर मुस्लीम सैनिकांना डुक्कर अपवित्र असे यामुळे सैनिकामध्ये तीव्र नाराजी पसरली होती. |
05 | तत्कालिन कारण- | काडतुसाला चरबी लावल्याची घटना बराकपूर छावणीतील सैनिकाला कळताच त्यांनी बदुकी वापरण्यास नकार दिला यामुळे दि. 29 मार्च 1857 रोजी मंगल पांडे नांवाच्या सैनिकानी इंग्रज अधिकारी मेजर सार्जट ह्यूसनवर गोळी झाडली आणि सन 1857 च्या उठावाला सुरवात झाली. |