आधुनिक भारताचा इतिहास सन 1857 ते 1990

भाग-1 प्रकरण पहिले –

आधुनिक भारताचा अभ्यास (1857 च्या उठावाचा अभ्यास ) करण्या अगोदर परकीय सत्ता भारतात कश्या रुजल्या याचा थोडक्यात अभ्यास करणे आवश्यक आहे.

प्रस्तावना– यूरोपियन ( परकीय सत्ता /व्यापारी) भारतात का आले ?- सन-1453 पूर्वीची परिस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे-सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कानी बायझन्टाईन साम्राज्याची राजधानी कॉन्स्टॅन्टिनोपल (इस्तांबूल) जिंकुन घेतले यामुळे युरोप आणि भारत यांच्यामधील जमिनी मार्गाने होणारा व्यापार बंद पडला जमीनीवरील मार्ग बंद पडल्यामुळे नव्या समुद्री मार्गाचा शोध घेणे आवश्यक झाले होते यामुळे युरोपाला थेट भारताशी जोडणा-या समुद्री मार्गाचा शोध घेणे साठी प्रयत्न सुरु झाले.

भारतामध्ये व्यापार करणेसाठी थेट समुद्रीमार्गाचा शोध घेण्याचा खालील प्रमाणे प्रयत्न करण्यात आला यामध्ये-

  1. इ.स. 1487 मध्ये बार्थोलोम ने हा भारताचा शोध घेण्यासाठी निघाला मात्र तो आफ्रिकेच्या दक्षिण टोक येथे (केप ऑफ गुड होप) येथे पोहचला
  2. इ.स. 1492 मध्ये इटली चा खलाशी कोलंबस हा भारताचा शोध घेण्यासाठी निघाला आणि तो अमेरिकेचा पूर्व किना-यावर येऊन पोचला
  3. इ.स. 1498 मध्ये पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा हा भारताचा शोध घेण्यासाठी निघाला आणि तो कालिकत बंदरावर येऊन पोचला त्याच्या जहाजाचा नाविक अब्दुल माजिद हा होता व त्याचे स्वागत हिंदू शासक -झामोरिन (जमोरिन) यामुळे ख-या अर्थाने पोतुगीज सर्वात प्रथम भारतात आले आहे सर्वात शेवटी भारतातून गेले वास्को द गामा भारतातून जेव्हा गेला तेव्हा तो मशाल्याचे पदार्थ इलायची तलम कापड घेऊन गेला त्याने त्या वस्तू युरोपात विकल्या तेव्हा त्याला 150 पट नफा मिळाला. (परकीय भारतात येण्याच्या क्रम P-पोर्तुगीज D-डच E-इंगज D-डॅनिश F-फ्रेंच )
  4. पहिले युरोपीय पोर्तुगीज- पोर्तुगीजांनी भारतात आल्या नंतर पुढील ठिकाणी वसाहती स्थापन केल्या -कालिकत, दिव, दमन, हुगळी, आणि गोवा पोर्तुगीजांचे भारतातील पहिला गव्हर्नर फ्रान्सिस्को अल्मीडा – सन 1505 ते 1509 ) याने गुजरात व इजिप्तच्या संयुक्त सेनेचा पराभव सन 1509 मध्ये पराभव केला पोर्तुगीजांचे भारतातील दुसरा गव्हर्नर अल्फान्सो डी. अल्बुकर्क (1509-1515) सन 1510 मध्ये व्हाईसरॉय हे पद देण्यात आले यांनी कृष्णदेवराय यांच्या मदतीने विजापूरच्या आदिल शहाला हरवून गोवा जिंकले अल्बुकर्क यांनी कृष्ण देवराय यांनी मदत केलेच्या बदल्यात अरबी घोडे भेट दिले होते. सन-1530 – गोवा पोर्तुगीजांची राजधानी बनली आणि अशाप्रकारे युरोपीय लोकांना माहीत झाले की समुद्री मार्गे भारतात कसे यायचे यामुळे एका मागोमाग परकीय भारतात यायला सुरवात झाली
  5. दुसरे युरोपीय डच- हॉलंड किंवा नेदरलँडचे रहिवाश्यांना डच म्हणतात सन 1596- कॉरनेलीस हस्तमान हा पहिला डच अधिकारी भारतात आला आणि त्यानी सन 1602 डच ईस्ट इंडीया कंपनीची स्थापना केली डच ईस्ट इंडीया कंपनी ही जगातील पहिली बहुराष्ट्रीय कंपनी होतीतसेच जगातील पहिली शेअर विकणारी कंपनी सुद्धा होती. डचांच्या वसाहती —पुलीकत, मसुलीपट्रटनम, नागपटनम, सुरत, भडोच, कासिमबाजार तामिळनाडू, कोची बेदराच्या युद्धात 1759 इंग्रजांकडून डचांचा पराभव झाला.
  6. तिसरे युरोपीय इंग्रज- व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले – 31 डिसेंबर 1600 मध्ये इंग्रजांनी ईस्ट इंडीया कंपनीची स्थापना केली. सन 1602 मध्ये राल्फ फिच हा पहिला इंग्रज अधिकारी अकबराच्या दरबारी व्यापाराची परवानगी मागणे साठी आला मात्र बादशहा अकबर यांच्या दरबारात आले होते. त्यानंतर 1608 कॅप्टन हॉकीन्स विलीअम फिच हेजहांगीर च्या दरबारात व्यापाराची परवानगी मागणेसाठी दरबारात आले मात्र जाहंगीर यांनी परवानगी नाकारली मात्र तद्नंतर १६१२ सर थोमास रो आला ( ब्रिटनच्या राणीचा दूत ) मग जहांगीर यांनी व्यापार करण्याची परवानगी दिली मग इंग्रजांनी ख-या अर्थाने भारतात पाय रोवन्यास सुरवात केली. यासाठी त्यानी पुढील प्रमाणे वसाहती स्थापन करण्यास सुरवात केली. इंग्रजांची वसाहत 1. सूरत- 1612 2.मुंबई- 1661 3.मद्रास 1639 4. कलकत्ता-1690 वसाहतीच्या रक्षणासाठी सन 1670 मध्ये सैन्य बाळगणे, युद्‌धाचे अधिकार मिळाले होते.सन 1759 मध्ये बेदराच्या युद्धात डचाना हरवले आणि फ्रेंचाना वान्दिवाशच्या लढाईत सन 1760 मध्ये हरवले आणि इंग्रज परकीय सत्ता मध्ये सर्वेसर्वा बनले
  7. चौथे परकीय डॅनिश- डेन्मार्कचे रहिवासी असलेले डॅनिश यांनी सन 1616 डॅनिश इस्ट इंडीया कंपनीची स्थापना केली मात्र त्यांनी भारतीय राजकारणात हस्तक्षेप केला नाही. त्यांनी त्रावणकोर, श्रीरंगपट्टणम, श्रीरामपुर येथे वसाहती स्थापन केल्या
  8. पाचवे युरोपीय फ्रेंच- इंग्रज सत्ताधीस नंतर फ्रेंच सत्ताधिस महत्वाचे आहेत. फ्रेंचांनी सन 1664 फ्रेंच इस्ट इंडीया कंपनीची स्थापना केली ही एक शासकीय कंपनी होती यामुळे या कंपनी वर काही निर्बंध होते भारतातील ज्या परकीय सत्ता स्पर्धा करित होत्या त्या मधून बाहेर पडली. फ्रेंचांनी पुढील प्रमाणे भारतात वसाहती स्थापन केल्या होत्या यांमध्ये सुरत -सन 1667, मच्छलीपट्टणम सन-1669 पाँडेचेरी सन -1674 , चंद्ननगर-सन 1690 फ्रेंचाचा पहिला गव्हर्नर फॅन्सिस्को कैरोन हा होता तर दुसरा गव्हर्नर डुप्ले हा होता डूप्ले हा थोडा आक्रमक वृतीचा होता यांनी इंग्रजाना युद्धात हरवले होते. त्यानंतर डूप्लेला सुद्धा इंग्रजा कडून हरला होता यामुळे फ्रांस सरकारने डूप्लेला परत फ्रांसला बोलावले आणि तदनंतर शेवटी वान्दिवाश च्या लढाईत सन 1760 मध्ये इंग्रजांनी फ्रेंचांना हरवले होते. अशा प्रकारे इंग्रजांनी परकीय सत्ता यांना एक एक करीत युद्धात हरवले आणि मग भारतीय राजकारणात हस्तक्षेप करून भारतीय देशी सत्ता ( राजांना ) हरवण्यास सुरवात केली.

2. भाग-2 प्रकरण दुसरे- इंग्रज फ्रेंच यांच्या मधील झालेली तीन कर्नाटक युद्ध

प्रस्तावना-भारता मध्ये व्यापार करण्याच्या अंतिम संघर्षामध्ये शेवटी इंग्रज आणि फ्रेंच हे दोघेच बाकी राहिले आणि त्यांच्या मध्ये एकमेव व्यापारी वर्चस्व स्थापन करणेसाठी विविध लहान मोठ्या कारणांनी कर्नाटकच्या भूमीवर तीन युद्धे लढले गेले.तसेच त्यावेळी इतर देशात सुद्धा यांच्या वसाहती होत्या तिकडे भारताबाहेरील वसाहती मध्ये युद्ध सुरु झाले कि ईकडे भारतात सुद्धा इंग्रज फ्रेंच यांच्या मध्ये युद्ध सुरु व्हायचे यामुळे इंग्रज फ्रेंच यांच्यात सतत ठिणगी पेटलेली असयाची.

  1. पहिले इंग्रज, फ्रेंच/ कर्नाटक युद्ध– सन 1746-48 कारण-1740 मध्ये ऑस्ट्रिया चा वारस इंग्रजाच्या मर्जीतील पाहिजे कि फ्रान्स च्या मर्जीतील पाहिजे यावरून वाद झाला आणि त्यामुळे पहिले कर्नाटक युद्ध सन 1746-48 मध्ये घडले हे युद्ध एक्शला चपेल च्या तहाने समाप्त झाले. हे युद्ध डूप्ले च्या काळात लढले गेले यावेळी कर्नाटक चा नवाब अन्वरुद्दिन होता तसेच कर्नाटकचा सेनापती-महफुज खान होता.आणि इंग्रज सेनापती बारनेट होता व फ्रेन्च सेनापती कॅप्टन पैराडाइज होता.
  2. दुसरे इंग्रज, फ्रेंच/ कर्नाटक युद्ध– सन 1749-54 कारण-कर्नाटक नवाब दोस्तअली व हैद्राबाद निजाम निजाम उल मुल्क असफजहा यांच्या मृत्यूनंतर या दोन्ही संस्थाना मध्ये वारसा हक्क संघर्ष निर्माण झाला यावेळी अन्वरुद्दिन आणि नासिर जंग यांची बाजू घेतली इंग्रजांनी घेतली होती.यामध्ये फ्रेंच यांनी दोस्तअली चा मुलगा अन्वरुद्दिन यांस फ्रेंचांनी ( डूप्ले )1749 मध्ये ठार केले तसेच हैद्राबादचा नवाब निजाम निजाम उल मुल्क असफजहा याचा मुलगा नासिरजंग यास 1750 मध्ये ठार केले आणि कर्नाटक च्या नवाबपदी चंदासाहेब ( दोस्तअलीचा जावई ) यास नवाबपदी बसविले आणि हैद्राबादच्या निजामपदी मुजफ्फरजंग ( निजाम उल मुल्क असफजहा याचा भाचा ) यास बसविले यामुळे दुसरे कर्नाटक युद्ध झाले आणि ते पौन्डेचेरीच्या तहाने युद्ध समाप्त झाले
  3. तिसरे इंग्रज, फ्रेंच/ कर्नाटक युद्ध– सन 1756-63 कारण-युरोपात झालेले सप्तवार्षीक युद्ध सन 1758 मध्ये फ्रेंच अधिकारी काऊन्ट लाली हा भारतात येतो आणि पोंडेचेरी जवळील सेंट डेव्हिड किल्ला जिंकतो आणि नंतर तंजावर वर आक्रमण करतो मात्र तेथे त्याचा पराभव होतो यापुढे काऊन्ट लाली हा बुसी (फ्रेंच अधिकारी ) च्या मदतीने मद्रासला वेढा टाकते मात्र येथे हि इंग्रज फ्रेंचांचा पराभव करतात यापुढे सन-1760 मध्ये इंग्रज आणि फ्रेंच यांच्या मध्ये वान्दिवाशच्या लढाई होते. आणि या लढाईत इंग्रज अधिकारी आयरकुट हा फ्रेन्चाचा पराभव करतो आणि फ्रेंचाचे महत्वाचे ठिकाण पोंडेचेरी ला वेढा टाकून आठ महिन्याने जिंकून घेतो. तिकडे युरोपात 1763 मध्ये सप्तवर्षीक युद्ध पॅरिस च्या तहाने समाप्त होते. त्याच नुसार इकडे भारतात हि इंग्रज फ्रेंच संघर्ष त्याच तहाने समाप्त होतो.या तहाने फ्रेंचाना पोन्डेचेरी दिली जाते इंग्राजाच्या साम्राज्य विस्ताराच्या धोरणात हस्तक्षेप करणार नाही असे ठरले जाते. अशा प्रकारे युरोपीय सत्ता संघर्षा मध्ये इंग्रज सरस ठरले आणि त्यांनी पुढे भारतावर 1947 पर्यंत सत्ता गाजवली
Scroll to Top