बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अंतर्गत राजावाडी रुग्णालयात अतिदक्षता विभागाच्या बाजुला असलेल्या मानसोपचार विभागाचे स्थानांतरण करुन हाय डिपेन्डन्सी युनिट सुरु करण्यासाठी “परिचारीका” या संवर्गातील 18 अतिरिक्त पदे कंत्राटी तत्वावर भरण्याकरिता मा. अतिरिक्त आयुक्त (प.उप) यांचा क्र.अति.आयुक्त/प.उप./5224/डी दि. 04.03.2024 अन्वये मंजूरी प्राप्त झाली आहे. त्यानुसार १८ पदांकरीता खालील अर्हताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
भरावयाची एकूण पदे :-18
मासिक मानधन :-30,000/-
शैक्षणिक अर्हता-
- (HSC(Science), General Nursing Midwifery 3 Years Course (GNM), MNC Registration (Maharashtra Nursing Council)
- उमेदवार संगणक MS-CIT परिक्षा उत्तीर्ण असावा
- उमेदवार 100 गुणांची मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असावा.
अर्ज करण्याचा कालावधी:- अर्जदारांनी अर्ज दि. 22.07.2024 ते दि.26.07.2024 पर्यंत कार्यालयीन वेळेत राजावाडी रुग्णालय, घाटकोपर (पूर्व) येथे सादर करावयाचे आहेत. सदर दिनांका नंतर प्राप्त झालेले अर्ज विचारत घेतले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. (अर्जा सोबतची कागदपत्रे साक्षांकीत केलेली असावीत.)
सदर नियुक्ती ह्या १ वर्षाकरीता (एका वेळी सहा महिन्यांच्या) (४५ दिवसानंतर एक दिवसाचा खंड देऊन) अथवा सदर पदांवर कायम तत्वावर उमेदवार प्राप्त होईपर्यंत या पैकी जे अगोदर असेल. त्यांना महानगरपालिका कर्मचा-याप्रमाणे सेवेचे इतर कोणतेही फायदे अनुज्ञेय होणार नाहीत.
जाहिरात PDF मध्ये- https://drive.google.com/file/d/1Plm-WTEpzqoN-O5POncuWly9giinoTFS/view?usp=sharing
टीप- कृपया सदर पदासाठी अर्ज करताना जाहिरात काळजी पूर्वक वाचावी त्यानंतर अर्ज करण्यात यावा