महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सन 2024-25 मध्ये JEE/NEET परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरीता तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत पुस्तक संच वाटप करण्यासाठी इच्छूक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत
- एकूण लाभार्थी संख्या- 8000
- (4000 संख्या JEE करीता व 4000 संख्या NEET करीता)
- (लाभार्थी संख्येच्या तुलनेत सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणाप्रमाणे तसेच इयत्ता 10 वी मध्ये प्राप्त गुणांकनानुसार लाभ देण्यात येईल.)
योजनेच्या लाभासाठी पात्रता :-
- विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा असावी.
- विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा असावी तसेच विद्यार्थी नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा असावी.
- सन -2024 मध्ये 10 वी चा परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर योजनेच्या लाभाकरीता पात्र राहतील.
- विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. या बाबतची कागदपत्रे स्पष्ट व दुष्य पद्धतीने जोडणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्यांची निवड ही इयत्ता 10 वी च्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आक्षणानुसार करण्यात येईल.
- इयत्ता 10 वी मध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांकरीता 70% किंवा यापेक्षा जास्त तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरीता 60% किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे किंवा कसे हे विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड वरील नमुद पत्त्यावरुन ठरविल्या जाईल.
अधिक महितीसाठी pdf वाचा– https://drive.google.com/file/d/12RRxDV13OLCaoYC6Ji7c-27aPaxzDTHS/view?usp=sharing
अर्ज करणे साठी संकेतस्थळ –https://mahajyoti.org.in