MAHATRANSCO Recruitment-2024 महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या कंपनीच्या अंतर्गत 604 पदाची भरती

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या कंपनीच्या अंतर्गत एकूण ७ परिमंडल कार्यालये (अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कराड, पुणे, वाशी) व राज्य भार प्रेषण केंद्र, ऐरोली हे कार्यालय आहे. त्यापैकी ७ परिमंडल कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात वेगवेगळी मंडल कार्यालये आहेत. त्या त्या मंडल कार्यालया अंतर्गत येणा-या वेतनगट ३ मधील मंडल स्तरीय सेवाजेष्ठतेतील वरीष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली), तंत्रज्ञ १ (पारेषण प्रणाली) व तंत्रज्ञ २ (पारेषण प्रणाली) ची रिक्त पदे एकत्रित करून अनुशेषाप्रमाणे सरळसेवा भरतीद्वारे भरणे करीता अर्हतापात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पध्दतीने मागविण्यात येत आहेत

  • एकुण पदे-
  • वरीष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली),-126
  • तंत्रज्ञ १ (पारेषण प्रणाली) -185
  • तंत्रज्ञ २ (पारेषण प्रणाली)-293

वेतनश्रेणी-

  • वरीष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) या पदावर निवड झालेल्या उमेदवारास रु. 30810-1060-36110-1160- 47710-1265-88190या वेतन श्रेणीत वेतन मिळेल.
  • तंत्रज्ञ १ (पारेषण प्रणाली) या पदावर निवड झालेल्या उमेदवारास रु. 29935-955-34710-1060- 45310-1160-82430 या वेतन श्रेणीत वेतन मिळेल.
  • तंत्रज्ञ २ (पारेषण प्रणाली) या पदावर निवड झालेल्या उमेदवारास रु. 29035-710-32585-955-42135- 1060-72875 या वेतन श्रेणीत वेतन मिळेल.
  • तसेच मुळ वेतना व्यतिरिक्त महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय भत्ता वगैरे भत्ते कंपनीच्या नियमाप्रमाणे लागु राहतील.

शैक्षणिक पात्रता-

  • शिकाऊ उमेदवारी कायदा-१९६१ अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक. किंवा
  • औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून वीजतंत्री व्यवसायातील पाठ्यक्रम पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र धारक. किंवा
  • Candidate who has completed a course of 2 years duration under the scheme of Centre of Excellence (Electrical Sector) awarded by the NCTVT, New Delhi as per following details & Period:
Basic Courses  1 Year  Board Based Basic Training Course in Electrical Sector (BBBT).  
Advance Course / Module  6 monthsTraining in Advanced modules for next six months in following modules after BBBT. Operation & Maintenance of Equipment used in HT, LT, Substation & cable jointing”.  
Apprenticeship Training  6 months  6 months apprenticeship in the trade of Mechanic (HT, LT Equipment’s and Cable Jointing) Under Apprenticeship Act-1961 awarded by NCTVT, New Delhi  
The candidate should have completed & cleared each above courses/training/ apprenticeship for which he should
अ.क्र.  पदनाम  अनुभव
01वरीष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली)एकूण 06 वर्षाचा विद्युत पारेषण क्षेत्रातील अनुभव
02तंत्रज्ञ १ (पारेषण प्रणाली)एकूण 04 वर्षाचा विद्युत पारेषण क्षेत्रातील अनुभव
03तंत्रज्ञ २ (पारेषण प्रणाली)-एकूण 02 वर्षाचा विद्युत पारेषण क्षेत्रातील अनुभव

अनुभव हा उमेदवाराने संबधित पदासाठी विहित केलेली शैक्षणिक अर्हता धारण केल्यानंतर प्राप्त केलेला असावा.
 
विद्युत पारेषण क्षेत्रातील अनुभव म्हणजे :

  1. अति उच्चदाब उपकेंद्र आणि/किंवा अति उच्चदाब वाहिनी यांच्या संचलन आणि सुव्यवस्थेचा अनुभव आणि/किंवा अति उच्चदाब वाहिनी आणि/किंवा अति उच्चदाब उपकेंद्र यांच्या बांधकामाचा अनुभव आणि/किंवा विदयुत र्निमिती केंद्राशी संलग्न अति उच्चदाब उपकेंद्राच्या संचलन व सुव्यवस्थेचा अनुभव.
  2. अति उच्चदाब म्हणजे ६६ केव्ही व त्यावरील विद्युत दाबाची पातळी.
  3. ज्या कंपनीचे भाग भांडवल रु. १०० कोटी च्या वर आहे आणि विदयुत पारेषण हा त्या कंपनीचा मुख्य व्यवसाय आहे अशी केंद्र, राज्य शासनाची पारेषण कंपनी / किंवा इतर कोणतीही कंपनी ज्यास राज्य विदयुत नियामक आयोगाकडून खाजगी विदयुत पारेषण परवानाधारक म्हणून परवाना प्राप्त आहे, अशाच कंपनीचा अनुभव ग्राह्य धरण्यात येईल.
  4. खाजगी कंत्राटदार, मालक इ. यांनी जारी केलेल्या अनुभव प्रमाणपत्रातील अनुभव हा विद्युत क्षेत्र
    तसेच विद्युत पारेषण क्षेत्रातील अनुभव म्हणून ग्राह्य धरण्यात येणार नाही. केंद्र, राज्य शासनाच्या पारेषण कंपनीव्यतिरीक्त इतर कंपनी / संस्था कडील सादर केलेले अनुभव प्रमाणपत्र हे स्वयंस्पष्ट असावे. म्हणजेच अनुभव प्रमाणपत्रात कामाचे क्षेत्र / कामाचा प्रकार, एकूण वेतन व्यवस्थीत नमूद केलेले असावे, जेणेकरुन त्यांची पात्रता ठरविताना कोणतीही संदिग्धता राहणार नाही.

वयोमर्यादाः

  • दि. ३१.०७.२०२४ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे व कमाल वय ३८ वर्षे असावे. वयोमर्यादकरीता माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (एस.एस.सी.) प्रमाणपत्रावर नोंदविलेली / दर्शविलेली जन्मतारीख ग्राहय धरण्यात येईल.
  • शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व मागासवर्गीय, सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील उमेदवारांना कमाल वयोमर्यादा ५ वर्षांनी शिथीलक्षम राहील.
  • माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा ही त्यांचा सैनिकी सेवेचा कालावधी अधिक ०३ वर्षे इतका राहील.
  • प्राविण्य प्राप्त खेळाडूंसाठी कमाल वयोमर्यादा ४३ वर्षे इतकी राहील.
  • दिव्यांग उमेदवारांकरीता सर्वसाधारण कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष इतकी राहील.
  • प्रकल्पग्रस्त उमेदवारांकरीता कमाल वयोमर्यादा सरसकट ४५ वर्ष राहील.
  • महापारेषण कंपनीतील पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादा ५७ वर्षे राहील.

निवड पद्धत- ऑनलाईन परीक्षेद्वारे

परीक्षा पद्धत –ऑनलाईन

परिक्षा केंद्र- ऑनलाईन परिक्षेकरीता निश्चित केलेली परिक्षा केंद्रे खालील प्रमाणे असतील.

अहमदनगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपुर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर.

परीक्षा फीस-

  • खुला प्रवर्ग साठी – Rs.600/-
  • मागासवर्गीय, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, आर्थिक दृष्ट्या दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी- रु.300/-
  • दिव्यांग व माजी सैनिक-जाहिरातीत नमुद दिव्यांग प्रवर्गाकरीता पात्र दिव्यांग व माजी सैनिक यांना परिक्षा शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

अधिकृत संकेतस्थळ- https://www.mahatransco.in

अधिक माहितीसाठी जाहिरात pdf मध्ये- https://drive.google.com/file/d/1Eghy5uOB-jEYxLd025i99OjyHcRQFz7C/view?usp=sharing

महत्वाचे-

ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरीताच्या लिंकबाबत सूचनाः

ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरीता URL Link तयार करण्याचे काम सुरु आहे. अर्ज करण्याकरीताची URL Link तयार झाल्यानंतर त्याबाबतची अधिसूचना तातडीने व स्वतंत्रपणे कंपनीच्या संकेतस्थळावर व वर्तमानपत्रात प्रसारित करण्यात येईल व अर्ज सादर करण्याची सुविधा अर्जदारांना उपलब्ध करुन देण्यात येईल. तरी संभाव्य अर्जदारांनी कंपनीच्या संकेतस्थळावर लक्ष ठेवावे.

Scroll to Top