पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत वैद्यकीय विभागात मुलाखतीद्वारे पदभरती (walk in interview)

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैदयकिय विभागासाठी तांत्रिक संवर्गातील तज्ञ वैदयकिय अधिकारी (Specialist) पदे कंत्राटी करारनामा करुन walk in interview द्वारे भरणेबाबत..

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयातील विविध विभागासाठी आवश्यक असलेले विविध विभागासाठी विविध पदावरील एकुण २०३ तज्ञ वैदयकीय अधिकारी यांची नियुक्ती करणेकामी जाहिरात क्र ४१/२०२३-२०२४ दिनांक २८/०४/२०२३ प्रसिद्ध करणेत आलेली आहे. सदर जाहिराती अंती आज अखेर सोबतच्या “परि अ नुसार” रिक्त असलेल्या

पदांचे नावे आणि मानधना बाबत-

  • “कन्सल्टंट पदाकरिता रु. १,२५,०००/-,
  • ज्युनिअर कन्सल्टंट / रजिस्ट्रार पदाकरिता रु. १,००,०००/-
  • हाऊसमन पदाकरिता रु. ८०,०००/- ”
  • कंत्राटी वेतनावर काम करणेस इच्छुक तज्ञ वैदयकीय अधिकारी यांचेकडुन अर्ज मागविणेत येत आहेत.

अधिक माहिती-

  • पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उक्त नमुद रुग्णालयातील विविध विभागातील कामकाजाकरीता इच्छुक तज्ञ वैदयकिय अधिकारी यांचेकडुन अर्ज मागविणेत येत आहेत.
  • उक्त नमुद जाहिरातीमधील शैक्षणकि अर्हता, कंत्राटी वेतन / ठोक वेतन, अटी – शर्ती यामध्ये कोणताही बदल करणेत आलेला नसुन इच्छुक तज्ञ वैदयकिय अधिकारी यांनी उक्त नमुद कार्यालयात आवश्यक त्या सर्व शैक्षणिक अर्हता कागदपत्रासह उपस्थित रहावे.
  • नमुद अटि-शर्तीनुसार पात्र असलेल्या तज्ञ वैदयकीय अधिकारी यांचे अर्जामधुन वैदयकीय विभागास आवश्यक असलेल्या पदाकरिता तज्ञ वैदयकीय अधिकारी यांची नियुक्ती करणेत येईल.

मुलाखतीसाठी पत्ता/ठिकाण-वैदयकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, वैदयकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी-१८

तज्ञ वैदयकीय अधिकारी यांनी दर सोमवारी Walk In Interview द्वारे थेट मुलाखतीकामी यांचे कार्यालयात सर्व आवश्यक त्या कागदपत्रासह उपस्थीत रहावे.

मुलाखती साठी निवेदन-pdf-

https://drive.google.com/file/d/1Sfx-6nUqHTnsfwKPJmeQqJGHs0EgjPKB/view?usp=sharing

Scroll to Top