
कर्मचारी निवड आयोग (SSC) मार्फत केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये व विभागांमध्ये Junior Engineer (JE) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. SSC JE Recruitment 2026 अंतर्गत Civil, Electrical, Mechanical आणि संबंधित शाखांतील उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे. लवकर अर्ज करा
SSC JE भरती 2026 – थोडक्यात माहिती खालील प्रमाणे
- भरती संस्था: कर्मचारी निवड आयोग (SSC)
- परीक्षेचे नाव: SSC Junior Engineer Examination 2026
- एकूण पदे: 1,748
- पद: Junior Engineer (Civil/Electrical/Mechanical/Telecom)
- वेतन: ₹35,400 ते ₹1,12,400
- श्रेणी: Group ‘B’ (Non-Gazetted)
- अर्ज पद्धत: ऑनलाइन
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज सुरू: 02 सप्टेंबर 2026
- अर्जाची अंतिम तारीख: 22 सप्टेंबर 2026
- फी भरण्याची अंतिम तारीख: 23 सप्टेंबर 2026
- Correction Window: 28 ते 30 सप्टेंबर 2026
- Paper-I: ऑक्टोबर/नोव्हेंबर 2026
- Paper-II: डिसेंबर 2026
शैक्षणिक पात्रता
उमेदवाराकडे संबंधित शाखेतील Engineering Degree किंवा Diploma असणे आवश्यक आहे.
Civil / Electrical / Mechanical / Telecom शाखेतील उमेदवार पात्रतेनुसार संबंधित पदासाठी अर्ज करू शकतात. काही पदांसाठी Diploma धारकांना संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा (Age Limit)
१ ऑगस्ट २०२६ रोजी उमेदवाराचे वय खालीलप्रमाणे असावे: [1, 2]
- सर्वसाधारण पदे: १८ ते ३० वर्षे
- CPWD आणि DGLL विभागातील पदे: १८ ते ३२ वर्षे
- (शासकीय नियमांनुसार मागासवर्गीय उमेदवारांना वयात सवलत लागू राहील).
अर्ज शुल्क/ परिक्षा फी
- सामान्य उमेदवार: ₹100
- महिला / SC / ST / PwBD / Ex-Servicemen: शुल्कातून सूट
परीक्षा पद्धती
SSC JE परीक्षा दोन टप्प्यांत घेतली जाईल.
Paper-I:
General Intelligence & Reasoning, General Awareness आणि संबंधित Engineering विषयावर आधारित Computer Based Examination.
Paper-II:
संबंधित Engineering विषयाची Technical परीक्षा.
Paper-I मध्ये चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुणांची Negative Marking, तर Paper-II मध्ये चुकीच्या उत्तरासाठी 1 गुणाची Negative Marking आहे.
अर्ज कसा करावा?
पात्र उमेदवारांनी SSC च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन प्रथम OTR (One-Time Registration) पूर्ण करून SSC JE 2026 साठी ऑनलाइन अर्ज करावा.
अधिकृत वेबसाइट: ssc.gov.in
महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे
SSC Western Region अंतर्गत महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये परीक्षा केंद्रे उपलब्ध आहेत.
यामध्ये प्रमुखतः:
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- अमरावती
- कोल्हापूर
- छत्रपती संभाजीनगर
- नांदेड
- जळगाव
यांचा समावेश आहे. उमेदवारांना त्यांच्या संबंधित SSC Region मध्ये परीक्षा केंद्रांची पसंती देण्याची सुविधा आहे.
जाहिरात pdf मध्ये-
https://drive.google.com/file/d/1rIN3QPYhEBAgIomJKU1C_ymcUIRqwn3l/view?usp=drive_link
आपण वाचले नंतर कृपया गरजू विद्यार्थ्यांना शेअर जरूर करा
धन्यवाद
